Breaking News

रायगडात भटक्या श्वानांची दहशत कायम

वर्षभरात सहा हजार 427 अधिक  लोकांवर हल्ले

अलिबाग ः प्रतिनिधी 

रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात भटक्या श्वानांनी वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 82 जणांना श्वानदंश होत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कुत्र्यांमुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या 6 हजारहून अधिक घटना समोर आल्या आहेत, तर 2021पासून 39 हजारहून अधिक लोकांना श्वानदंश झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. ही आकडेवारी शहरी भागात शासकीय रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची आहे. यात खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांचा समावेश नाही. त्यामुळे ही संख्या अजूनही जास्त असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरीभागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग, पेण, महाड या शहरात श्वानदंशाच्या घटना घडल्या  आहेत.

शहरी भागात भटके श्वान झुंड करून राहतात. रात्रीच्या वेळी हे शहरातील रस्त्यावर झुंडीनेच फिरतात. काळोखात येणार्‍या जाणार्‍यावर भुंकतात. वाहन चालकांच्या मागे लागतात. आणि आक्रमक होऊन बरेचदा लहान मुले, वृध्द माणसांवर हल्ले देखील करतात. कुत्र्यांमुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. यात अनेक दुचाकीस्वार गंभिररीत्या जखमी झाले आहेत.गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील शहरीभागात कुत्र्याचे निर्बिजीकरण मोहिमा राबविण्यात आल्या, मात्र या मोहिमांना फारसे यश मिळतले  नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही शहरी भागात भटक्या श्वानांचे प्रमाण कमी झालेल नाही. निर्बिजीकरणानंतर आठ दिवस श्वानांची काळजी घेणे गरजेचे असते. या श्वानांना ठेवायचे कुठे? हा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर असतो.

सन        श्वानदंश

2020      8757

2021      9138

2022      10625

2023       6427

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात श्वान दंशावर मोफत उपचार केले जातात. त्यासाठी आवश्य औषधसाठा आणि लस साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

-डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply