Breaking News

उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

भरड धान्यापासून बनवलेल्या जेवणाचा महिलांनी घेतला आस्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरराष्ट्रीय पातळीवर 2023 हे भरड धान्य वर्ष जाहीर झाले असून 5 ते 25 जुलैदरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगडात 100 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 12) पनवेल येथे झाली. या वेळी महिलांनी भरड धान्यापासून बनवलेल्या जेवणाचा एकत्र आस्वाद घेतला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आम्रपाली साळवे, प्रज्ञा धवण, सरचिटणीस मंजुषा कुद्रीमोती, सचिव शिल्पा मराठे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, केंद्रीय समन्वयक सरचिटणीस संध्या शारबिद्रे, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, उरण तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, निता माळी, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चाच्या सपना पाटील, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, मोना अडवाणी, प्रतिभा भोईर, साधना पवार, मृणाल खेडकर, सुप्रिया मुकादम, शिल्पा म्हात्रे, दिपाली तिवारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
दरम्यान, भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीसपदी दिपाली तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

देश नव्याने घडतोय -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्याने घडत आहे, असे प्रतिपादन केले. भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या वर्षाचे 365 दिवस पक्षासाठी सकारात्मक उर्जा निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगून मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले.

Check Also

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, …

Leave a Reply