नियमाचे उल्लंघन करणार्यावा होणार कारवाइ; पनवेल वाहतूक शाखेचा इशारा
पनवेल : वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणार्या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्या विरोधात कारवाईचा इशारा दिला.
पनवेल शहरासह तालुक्यात 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बहुतांश वाहने नियमांना बगल देत विनापरवाना, विनानोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेत असल्याच्या तक्रारी पनवेल वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार पनवेल वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणार्या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्या विरोधात कारवाईचा इशारा दिला. त्याचप्रमाणे वाहनचालकांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी वाहतूक शाखा सकारात्मक असल्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकार्यांना दिले.
या वेळी महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हुंबने तसेच इतर वाहन चालक व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.