Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त एक लाख कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती या सर्व परिस्थितीत लोकांना भरीव मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.  
कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने वाढदिवस घरगुती व साधेपणाने साजरा झाला असला तरी दूरध्वनी, समाजमाध्यमांद्वारे हजारो जणांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, किरण चौधरी, राजेश चौधरी, सचिन दाभेकर, लक्ष्मी चौधरी, गीता जाधव, पूनम सकपाळ, भारती चौधरी, शीतल चौधरी आदी माथेरानच्या टीमने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबरच आजच्या या शुभदिनापासून आम्ही अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही दिली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply