अन्य दोघेही जखमी
महाड : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरा नाजिक सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या दोन बैलांना धडक बसल्याने दुचाकी वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.
15 जुलैला रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असुन, प्रेम मुकेश पवार (वय 18, रा. स्वारगेट, पुणे) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो आपला मित्र अभिषेक बनकर (रा. धनकवडी, पुणे) याच्यासोबत मुंबई-गोवा महामार्गावरून पोलादपूरच्या दिशेने जात होता. महामार्गावर याच दरम्यान महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील दक्ष देशमुख हादेखील दुसर्या एका दुचाकीने पोलादपूरच्या दिशेने जात होता. रात्री पावणे बाराच्या तुम्हाला रस्त्यावर दोन बैल आल्याने या दुचाकीची धडक दोन बैलांना बसली. यामध्ये प्रेम पवार हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी अभिषेक बनकर हा जखमी झाला.
याचवेळी दुसर्या एका दुचाकीने पोलादपूर कडे जात असलेला दक्ष देशमुख हा देखील या अपघातात दरम्यान जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …