Breaking News

कामोठ्यात भाजपची टिफिन बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 16) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती.
सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या ब्रिदवाक्याला अनुसरून पनवेल विधानसभा भाचपची टिफिन बैठक कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात झाली. या बैठकीस भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, भाजप ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत तसेच प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, तेजस जाधव, प्रवीण कोरडे, अजय मोरे, दामोदर चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, माजी नगरसेविका नगरसेविका अरुणा भगत यांच्यासह वर्षा शेलार, नंदा पाटील, वैशाली घोलप, दीपाली तिवारी, मनीषा वणवे, दीपाली पवार, श्रुतिका देवरूखकर, ललिता डफलफुडी, वैशाली अडीत, दिप्ती हाटे, रश्मी भारतवाज आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेली कामे व राबविलेल्या योजना घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन या वेळी प्रमुख नेत्यांनी केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply