पनवेल : वार्ताहर
21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे येथे घडली आहे.
हर्षदा गावंड (वय 21, रा. दूरशेत, पेण) असे तिचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …