पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेलजवळ एमएसईबीची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती. त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली डीपी उभी करून घेतली व त्या डीपीला स्वखर्चाने वेल्डिंग मारून दिली. त्यानंतर त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. याबद्दल परिसरातील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …