पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जि.प.गट व उलवे नोड परिसरातील रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला. या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिवराव कदम, लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, विजय घरत, रूपेश धुमाळ, निलेश खारकर, सचिन घरत, धीरज ओवळेकर आदी उपस्थित होते.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper