Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवारी (दि. 5) सायंकाळी 5 वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भजनसम्राट रायगड भूषण हभप निवृत्तीबुवा चौधरी, सिडको युनियनचे सेक्रेटरी जे. टी. पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, हभप नंदकुमार कर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात प्रख्यात गायक रायगड भूषण उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे तर तबल्यावर महेश कानोले साथ देणार आहेत, तर ’सूर नवा ध्यास नवा’ फेम गायिका रश्मी मोघे यांचे उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना हार्मोनियमवर सिद्धार्थ जोशी, तबल्यावर किशोर पांडे, पखवाजवर मधुकर धोंगडे, साईट रिदम विशाल वाघमारे आणि झांजवर जगदीश म्हात्रे यांची साथ असणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप हभप निवृत्तीबुवा चौधरी यांच्या अभंगवाणीने होणार आहे. त्यांना वसंतशेठ पाटील, शंकर म्हात्रे, नारायणबुवा पाटील, कृष्णा पवार, मोतीराम कडू, जितेंद्र म्हात्रे, मछिंद्र पाटील व नादब्रम्ह साधना मंडळ शिष्य परिवाराची साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाचा संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक अक्षय चौधरी व वैभव चौधरी यांनी केले आहे.

  • शनिवारी गीतरामायण ः

    जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 5)सायंकाळी 6 वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीतरामायण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले असून मोफत प्रवेशिका माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, लोंढे खानावळ आणि अमोल खेर स्टेशनरी टिळक रोड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी केले आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply