Breaking News

भाजप उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत पदाधिकार्‍यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांची घोषणा केली आहे.
यामध्ये जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध मोर्चांचे जिल्हाध्यक्ष, आघाड्यांचे जिल्हा संयोजक तसेच नऊ मंडलांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उत्तर रायगड सरचिटणीसपदी दीपक बेहेरे, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारूशीला घरत; उपाध्यक्षपदी वसंत भोईर, जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, विठ्ठल मोरे, सुधीर ठोंबरे, डॉ. कविता चौतमोल, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव; चिटणीसपदी चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, मंगेश म्हसकर, सायली म्हात्रे, रत्नप्रभा घरत, विद्या तामखडे, किर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्षपदी अभिलाषा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी राजेश गायकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मन्सूर पटेल आणि आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी बंडू शिद यांची नियुक्ती झाली आहे.
कामगार आघाडी संयोजकपदी जितेंद्र घरत, फ्रेंडस् ऑफ बीजेपी नितीन कांदळगावकर, जैन प्रकोष्ट अशोक ओसवाल, आध्यात्मिक समन्वय आघाडी काशिनाथ पारठे, सहकार सेल अशोक मोटे, सोशल मीडिया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, भटके-विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगजे, सांस्कृतिक सेल संयोजक अभिषेक पटवर्धन, ट्रान्सपोर्ट सेल सुधीर घरत, प्रज्ञा सेल गीता चौधरी, आयुष्यमान भारत सेल ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव आरती तायडे, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, मच्छीमार सेल प्रदीप नाखवा, दक्षिण भारतीय सेल संयोजक श्रीनिवास कोडूरू, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, वैद्यकीय सेल संयोजक डॉ. संतोष आगलावे, एनजीओ संपर्क आघाडी मंदार मेहेंदळे, शिक्षक सेल के.सी.पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल सी.सी.भगत, दिव्यांग सेल विलास फडके, कायदा सेल राजेंद्र अग्रवाल, क्रीडा प्रकोष्ट विनोद नाईक, रेल्वे प्रवासी प्रकोष्ट उपेंद्र मराठे, उद्योग आघाडी सुरेश खानावकर आणि पदवीधर प्रकोष्टपदी राजेश कदम यांची नियुक्ती झाली आहे.
याशिवाय कर्जत मंडल अध्यक्षपदी राजेश भगत, खोपोली रमेश रेटरेकर, खालापूर प्रवीण मोरे, उरण रवी भोईर, पनवेल ग्रामीण अरुणशेठ भगत, पनवेल शहर अनिल भगत, कामोठे रवींद्र जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply