Friday , September 22 2023

घर विकण्याच्या वादातून चंद्रकांत कांबळे यांची हत्या

धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तिसे रेल्वे फाटकावरील गेटमन चंद्रकांत कांबळे यांची 21 ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने गोळी झाडून हत्या केली होती. घर विक्रीच्या वादातून विजय रमेश शेट्टी याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मयत चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल शेट्टी व तिचा पती विजय शेट्टी या दोघांच्या नावे असलेले खैरवाडी येथील घर विजयला विकायचे होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला असता पोलिसांनी विजयच्या घराची तपासणी करून मिळालेल्या पुराव्यानुसार मयत चंद्रकांत कांबळेंची हत्या विजयने केल्याचे निष्पन्न झाले आहे. विजयवर याआधीही गुन्हे दाखल आहेत.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply