Breaking News

सुधागडातील कोलथरेत शेतीविषयक कार्यशाळा; तंत्रज्ञानाची माहिती

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील कृषिकन्या रसिका फाटक यांनी आपल्या  कोलाथरे गावात मंगळवारी (दि. 21) शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे तसेच परशुराम आगिवले ,आनिल निवळकर, आभिजीत निवळकर यांनी शेतकर्‍यांना आधुनिक भात शेतीतील  एसआरटी तंत्रविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. झगडे, पंचायत समितीचे कृषी अधिकार मिलिंद चौधरी, कृषि सहाय्यक श्री. परबत व श्री कोळी आदींनी उपस्थित शेतकर्‍यांना शेती विषयक विविध योजनांची माहिती दिली. शेतीसंबंधी अडचणी व त्यांचे निसरण यावर कार्यशाळेत चर्चा झाली. यावेळी सरपंच संदेश कुंभार, उपसरपंच दिलीप देशमुख, पं.स. च्या माजी सभापती भारती शेळके, स्वाती कदम, रमेश देशमुख, सुरेश धनवी, सुधागड हितवर्धिनी संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई साठे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी आदि उपस्थिती होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply