Breaking News

‘मानसिकता बदलण्याची गरज’

नवी मुंबई : प्रतिनिधी 

कोरोना महामारी असो की इतर कोणताही साथीचे आजार! या कालावधीत नागरिकांना मिळणारे सल्ले तंतोतंत पाळले गेले. तर आपण त्यावर सहज मात करू. पण आपले काही नागरिक अशा मार्गदर्शनाला पायदळी तुडवून आपल्या मनाप्रमाणे वागत असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता बदलली तर कोरोनासारख्या वैश्विक महामारीवर सहज मात करू शकतो, असे मत मानोसपचारतज्ञ समिधा साठे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शासनाकडून आरोग्य सेवेसाठी खूपसे प्रयत्न केले जातात. पण ते तोकडे पडत आहेत. कोविड रुग्णालये सुरू केली आहेत. पण मनुष्यबळ कमी पडत असल्याने रूग्णाना सेवा देण्यास अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या प. पु. वामनराव पै यांच्या तत्वाप्रमाणे जगण्याची गरज भासू लागली आहे, असेही पुढे मानोसपचारतज्ञ समिधा साठे म्हणाल्या.

मार्च महिन्यापासून आपल्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून केंद्र, राज्य, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आदींकडून विविध टाळेबंदी, प्रतिबंध क्षेत्र घोषित केली.आता विविध मनपा क्षेत्रात लॉकडाऊन, हॉटस्पॉट झोनमध्ये लॉकडाऊन प्रक्रिया चालू आहे. तरी सुद्धा कोरोनावर मात करण्यास अपेक्षित असे यश येत नाही. याला कारण म्हणजे झाल्यावर बघू, काय होतंय? ही नागरिकांची मानसिकता असल्याचेही मानसोपचारतज्ञ साठे यांनी सांगितले.

शहरात फक्त लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली की नागरिक कोणत्याही सल्ल्याचा विचार न करता रस्त्यावर येतात. दुकाने, डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचवेळी सामाजिक अंतराचे भानही त्यांना राहत नाही. ही मनोवृत्ती चुकीची आहे. ती बदलण्याची गरज आहे. – समिधा साठे, मानसोपचारतज्ञ, रायगड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply