Breaking News

शासकीय जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ यांना अटक

रेवदंडा, मुरूड : प्रतिनिधी
शासकीय जमिनीची खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हाप्रमुख आणि कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुरूड तालुक्यातील कोर्लई हद्दीत बनावट खरेदी दस्ताऐवज बनवून शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याने कोर्लई येथील दोघे व उल्हासनगर येथील एक महिला असा तिघांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासदरम्यान या गुन्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख व कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात बोर्ली मंडल अधिकारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोर्लई येथील प्रितेश रोटकर व विनय महालकर यांनी 6 ते 24 जून 2022 दरम्यान कोर्लई ग्रामपंचायतीची मिळकत शासकीय असतानाही ही जमीन बनावट खरेदी खतामध्ये नमूद केली व याचे संजीवनी भगत (रा. उल्हासनगर) यांनी बनावट खरेदी दस्ताऐवज बनविले. या शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 420,465,467 470,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख व कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचाही यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply