Breaking News

ऑनलाइन ई-म्युझिकल किक बॉक्सिंग स्पर्धेस प्रतिसाद

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अनेक खेळाडू घरीच सराव करीत आहेत. त्यानुसार कराटेचा सराव सक्रिय ठेवण्यासाठी वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनने राज्यस्तरीय ऑनलाइन ई- म्युझिकल किक बॉक्सिंग चषक स्पर्धा 28 व 29 एप्रिल रोजी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत अहमदनगर, बीड, मुंबई, पालघर, वसई, विरार, पनवेल, रायगड, औरंगाबाद, वर्धा, वाशिम, ठाणे, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा, नागपूर अशा जिल्ह्यांमधून 207 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी आपल्या घरी राहून 207 खेळाडूंनी म्युझिकल फोम करून व्हिडीओ असोसिएशनला पाठविले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून कौस्तुभ दास (गोल्ड-पेण), सौम्या झिंजे (सिल्व्हर-पेण), रविना म्हात्रे (ब्राँझ-पेण), सलोनी सावंत (ब्राँझ-पेण), हर्षदा मोकल (ब्राँझ-खांदा कॉलनी, पनवेल), अथर्व मसुरकर (ब्राँझ-खांदा कॉलनी, पनवेल) यांनी सुयश मिळविले. या वेळी पंचांनी आपल्या घरी राहून झूम अ‍ॅपद्वारे सदर स्पर्धेचा निकाल दिला. स्पर्धा तांत्रिक अधिकारी म्हणून प्रवीण काळे (सांगली), इन्चार्ज सूर्यप्रकाश मुंडाप्पा (वसई-विरार), इक्बाल शेख (पिंपरी-चिंचवड), सुरेश मिरकर (औरंगाबाद), सागर सुर्वे (पुणे), कृष्णा ढोबळे (वर्धा), रवींद्र म्हात्रे (रायगड), संतोष खंदारे (मुंबई), मंदार पनवेलकर (पनवेल), सपना मॅडम (पालघर), सिद्धार्थ बनसोडे (पिंपरी-चिंचवड) यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक रवींद्र म्हात्रे व मंदार पनवेलकर यांनी कौतुक केले आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply