Breaking News

कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरिकांची निशुल्क तपासणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कॅन्सरचा विळखा वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकारातून आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 11) पनवेल येथे निशुल्क कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले होते.
बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसन आदी कारणांमुळे कर्करुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्करोगामुळे अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. या रोगास कारणीभूत जीवनशैली व निदान याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजप जैन प्रकोष्ठच्या वतीने महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान सुरू आहे. या अभियानात मोबाईल कॅन्सर डिटेक्शन वाहनाच्या माध्यमातून रुग्णांची मोफत तपासून करण्यात येऊन उपचाराबाबत तज्ज्ञ डॉक्टरमार्फत सल्ला देण्यात येतो.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिरावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जैन प्रकोष्ट प्रदेश प्रमुख संदीप भंडारी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, मदन पाटील, भाजप व्यापारी प्रकोष्ट संयोजक विनोद बाफना, पनवेल शहर कोष अध्यक्ष संजय जैन, जैन प्रकोष्ट संयोजक राकेश काठेड, शिव देवडा, दीपक समोता, जितेंद्र संचेती, संजय बाफना, राजेश बढाया, ललित चन्नालिया, मोतीलाल जैन, नितीन मुनोत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply