Breaking News

भाताण ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलध्ये खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल काठावले, अरुण पाटील, तसेच दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण ग्रामीण अध्यक्ष रवी भोईर, पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, पनवेल मनपाचे माजी नगरसेवक बबन मुकादम, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, प्रवीण ठाकूर, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील, भाजप गळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, प्रवीण खंडागळे, विद्याधर जोशी, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, कसळखंडचे उपसरपंच महेंद्र गोजे, किरण माळी, आप्पा भागीत, भाताण ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या रसिका भोईर, रजनी मुकादम, गुरुनाथ खारके, अनंता सते, दत्तात्रेय पाटील, भरत पाटील, आनंद भोईर, अनिल भोईर, अशोक भोईर, तुकाराम गाताडे, किरण मुकादम, स्वप्नील भोईर, समीर भोईर, एकनाथ ठाकूर, रुपेश भोईर यांच्यसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी भाताण ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय ठाकूर, माजी उपसरपंच मंदा ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश जुमारे, अजित सते, सामाजिक कार्यकर्ते संजय काठावले, संदीप काठावले, राजेंद्र घरत, जनार्दन ठाकूर, रमेश ठाकूर, विठ्ठल ठाकूर, शंकर पाटील, रामदास पाटील, जगदीश काठावले, रुपेश ठाकूर, कुणाल ठाकूर, कल्पेश पाटील, नरेश पाटील, शुभम ठाकूर, अभिषेख ठाकूर, हरिश्चंद्र ठाकूर, किशोर ठाकूर, जनार्दन पाटील, कृष्णा पाटील, राजेश ठाकूर, राकेश ठाकूर, सीताराम ठाकूर, राहुल खाने, दर्शन खाने, अनंता ठाकूर, सुनील काठावले, भगवान पाटील, दीपक पाटील, सुरेश पाटील, नथुराम पाटील, समीर ठाकूर, संदेश ठाकूर, रोशन ठाकूर, रुपेश जुमारे, अनिल ठाकूर, प्रभाकर ठाकूर, रामदास ठाकूर, अनिल पाटील, हनुमान काठावले, योगेश भोईर, यश काठावले, सतीश ठाकूर, निशाद ठाकूर, बबन काठावले, हरिश्चंद्र ठाकूर, राजेंद्र घरत, अंकुश ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
दरम्यान नवनिर्वाचित खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, नवनिर्वाचित उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, उत्तर रायगड जिल्हा ट्रान्सपोर्ट सेलचे सुधीर घरत, आदिवासी मोर्चाचे बंडू शीद यानिमित्त मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply