Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पुस्तकांचे लोकार्पण भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) झाले.
या पुस्तकांच्या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजू शर्मा, कळंबोली सरचिटणीस दिलीप बिस्ट, विष्णू गायकवाड, आबा घुटुगडे, प्रकाश शेलार, पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुषाभ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अभ्यासिकेत युपीएससी, एमपीएससी, इंजिनिअरिंग सरळ सेवा, पोलीस भरती, तालाठी, ग्रामसेवक तसेच बँकिंग क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply