नवी मुंबई :प्रतिनिधी
विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात भाजप पदाधिकार्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले.
राज्यातील कोकण, कोल्हापूर, सोलापूर पश्चिम व उत्तर महाराष्ट्र परिसरातील पदाधिकार्यांनानी विविध समाजहिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, चक्रीवादळात कोळी बांधवांना मदतीचा हात देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या बाबत आमदार रमेश पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर ते भाऊकही झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री वाघेला यांनी दूरध्वनी वरून आमदार रमेश पाटील यांचे शुभचिंतन केले. तर राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मोबाइलवरून आमदार रमेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या.