Breaking News

रो-रो बोटीतून प्रवासी समुद्रात पडला; मांडव्याजवळील घटना

अलिबाग : रामप्रहर वृत्त
मुंबई-मांडवा रो-रो बोटीने प्रवास करीत असताना एक प्रवासी मांडवा जवळील समुद्रामध्ये पडला. नैमुद्दीन चौधरी असे या प्रवाशाचे नाव आहे. नैमुद्दीन अद्याप सापडला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सोमवारी (दि. 9) सकाळी 8 वाजता रो-रो बोट मुंबईहून मंडव्याला (अलिबाग) यायला निघाली. बोट मांडाव्याजवळ आली असता या बोटीतून प्रवास करणारा नैमुद्दीन चौधरी समुद्रात पडला.
या घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर, मांडवा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सह्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील व मांडवा पोलीस ठाण्यातील त्यांचे सहकारी मडवा बंदर येथे पोहचले.
शासकीय स्पीड बोट, खासगी स्पीड बोट व स्थानिक मच्छिमारांच्या सहा बोटी घेऊन मांडवा बंदर परिसरात नैमुद्दीन चौधरी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो अद्याप सापडला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply