
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई सीवूड्समध्ये भाजप युवा मोर्चाचे विकास निकम यांच्यातर्फे गरजूंना रेनकोट व पालिकेच्या कर्मचार्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक हातावर पोट असणार्या नागरिकांना संरक्षणार्थ देण्यात आले. या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी दत्ता घंगाळे, जयवंत तांडेल, अंकुर जयस्वाल, शशी भलाल, योगेश गुप्ता, समाधान चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.