पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्याअंतर्गत सोमटणे गु्रपग्रामपंचायतीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुक या प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी तेजस्वीनी पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून दिपा पाटील, मयूरी पवार, नरेंद्र म्हस्कर प्रभाग क्रमांक 2 मधून भाविका बैकर, सुवर्णा कांबळे, विशाल पाटील तर प्रभाग क्रमांक 3 मधून अविनाश मुंढे, रजनी मुंढे, आंबो मुंढे रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांची प्रचार रॅली काढण्यात आली तसेच मतदारांपर्यत्त पोहचून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी पुंडलिक दिघे, मारुती पाटील, दत्तात्रेय पाटील, यशवंत गायकर, कृष्णा मोरे, धनंजय पाटील, रमेश पाटील, नितीन तांडेल, विनायक पाटील, महेश मुंढे, रघुनाथ दिघे, लक्ष्मण बैकर, लक्ष्मण कांबळे, रवी पाटील, महेंद्र कांबळे, जीवन मुंढे, रामा मुंढे, मंगेश पोपेटा, चेतन पोपेटा, जयंद्र मुंडे, प्रसाद भोपी, महेश बैकर, महेंद्र बैकर, गंगाराम पाटील, रमेश पाटील यांच्यासह सोमटणे, दहिवली, नारपोली येथील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …