Breaking News

कळंबुसरे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

उरण : रामप्रहर वृत्त
कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील यांनी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण,मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती. शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करूनसुद्धा कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच संबधित भ्रष्टाचारप्रकरणी सरपंच तसेच ग्रामसेवकावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नव्हती. त्यामुळे कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील हे सोमवार पासून बेलापूर मधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.
या वेळी कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन केणी यांनी शासनाकडून आम्हाला न्यान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply