Breaking News

शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसत असून अनेक तरुण भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. उरण मतदारसंघातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील बारापाडा येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी
(दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले.
या वेळी केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष विद्याधर जोशी, भाजपचे नेते फयाज दाखवे, कार्नाळा गु्रप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल पाटील, दिनेश पाटील, उमेश पाटील, कर्नाळा विभागाचे भाजप नेते बाळूशेठ पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. बारापाडा येथील ज्ञानेश्वर गावंड, अमित गावंड, माधव म्हात्रे, नामदेव पाटील, मुरलीधर पाटील, नयन पाटील, अजय म्हात्रे, शाम पाटील, तुकाराम पाटील, जयराम पाटील, दिपक नांदगावकर, संदेश म्हात्रे, सुशांत नांदगावकर, सुनील नांदगावकर या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply