खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तसेच माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने खारघर महोत्सव 2023-24 आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) झाले.
खारघर सेक्टर 15 येथील फटाका मैदानात हा महोत्सव सुरू झाला आहे. महोत्सवाच्या उद्घाटनावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन वास्कर, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, संतोष गायकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या महोत्सवात पहिल्यांदाच अंडर वॉटर फिश टनल उभारण्यात आला असून तो नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या अंडरवॉटर फिश टनलमध्ये विविध प्रकारचे मासे आहेत. पाण्याखालील बोगदा हा प्रदर्शनाचा सर्वात आकर्षक भाग आहे, ज्यामध्ये रंगीबेरंगी प्रकारांसह विविध आकार आणि रंगांचे विविध प्रकारचे मासे आहेत.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …