Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली दिवाळे येथील मच्छी मार्केटची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटमध्ये विविध सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महापालिकेच्या अधिकार्‍यांसह कोळी बांधवांचा अभ्यास दौरा सोमवारी (दि.1) नवी मुंबईतील दिवाळे येथे आयोजित करण्यात आला होता.
या अभ्यास दौर्‍यात नवी मुंबई महापालिकेच्या दिवाळे गावातील मच्छी मार्केटची पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या सुविधांची माहिती घेण्यात आली. मच्छी मार्केटमधील ओटे, रूंद रस्ता तसेच पार्किंगच्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांना मच्छी मार्केटसंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या.
या दौर्‍यात भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर, सुधीर साळुंखे, कोळी बांधव हारू भगत, दत्ता पाटील, कमलाकर भोईर, प्रमोद भगत, किरण भोईर, गजानन भोईर, एकनाथ भोईर, सुनंदा पाटील, ईटा भोईर, इंद्रा पाटील, विठाबाई भगत, लक्ष्मी पाटील आदी सहभागी झाले होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply