Breaking News

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान कायम

दुबई : वृत्तसंस्था
भारताचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड या कसोटी सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीकडून ताजी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात द्विशतक ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात विजय मिळवला. लाबूशेनला सामनावीराचा
आणि मालिकाविराचा किताब देण्यात आला. त्याच्या चांगल्या खेळीचा त्याला क्रमवारीतदेखील फायदा झाला. तो दमदार भरारी घेत तिसर्‍या स्थानी विराजमान झाला आहे. आता त्याच्या पुढे केवळ स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे दोन फलंदाज आहेत. विराट सध्या 928 गुणांसह अव्वल, तर स्मिथ 911 गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे.
ताज्या यादीत भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला फटका बसला आहे. पुजाराची एका स्थानाने घसरण होऊन तो 791 गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला, तर अजिंक्य रहाणेची दोन स्थानांनी घसरण होऊन तो 759 गुणांसह नवव्या स्थानी गेला आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत फारसा उलटफेर झालेला नाही. भारताचा जसप्रीत बुमराह सहाव्या, रविचंद्रन अश्विन नवव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानी कायम आहे, तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा दुसर्‍या स्थानी कायम आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply