Breaking News

14 जानेवारीला ’नमो’ खारघर मॅरेथॉन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’नमो चषक’ अंतर्गत रविवारी (दि.14) ’एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ’नमो चषक’ स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचेसुद्धा आयोजन करण्यात येत आहे. नमो चषक अंतर्गत या स्पर्धांमुळे युवा पिढीला कला व क्रीडा स्पर्धेकडे आकृष्ट करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात 25 हजारपेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
14 जानेवारीला खारघर मधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या खारघर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी 9 वाजता होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी लाभणार आहे.
स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारिख 6 जानेवारी असून चेस्ट नंबर 10 जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी घेऊन जाणे अनिवार्य आहे. स्पर्धेची नाव नोंदणी www.khargharmarathon.in या संकेतस्थळावर तसेच बारकोड ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अधिक माहितीसाठी 02227744410, 02227744577, 02268574401, 02268574402, 02268574407, 8898777711 किंवा 8097684664 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धक, क्रीडारसिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
– बक्षिसांचा तपशिल –
पुरुष खुला गट (फक्त रायगड जिल्हा) – अंतर 10 किलोमीटर
प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये, तृतीय क्रमांक 10 हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.
महिला खुला गट (फक्त रायगड जिल्हा) – अंतर 10 किलोमीटर
प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये, तृतीय क्रमांक 10 हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.
17 वर्षाखालील मुले गट (फक्त रायगड जिल्हा) – अंतर 5 किलोमीटर
प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, तृतीय क्रमांक 2 हजार रुपये तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये.
17 वर्षाखालील मुली गट (फक्त रायगड जिल्हा) अंतर 5 किलोमीटर
प्रथम क्रमांक- 05 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, तृतीय क्रमांक 2 हजार रुपये तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये.
14 वर्षाखालील मुले गट (फक्त रायगड जिल्हा) अंतर 5 किलोमीटर
प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, तृतीय क्रमांक 2 हजार रुपये तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये.
14 वर्षाखालील मुली गट (फक्त रायगड जिल्हा) अंतर 5 किलोमीटर
प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, तृतीय क्रमांक 2 हजार रुपये तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये.
विशेष आकर्षण खारघर दौड – अंतर 3 किलोमीटर
स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
सिनिअर सिटीझन दौड – अंतर 2 किलोमीटर
प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, तृतीय क्रमांक 2 हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply