खारघर : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो खारघर मॅरेथॉन रविवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर नमो खारघर सायक्लोथॉन शनिवारी (दि.13) झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. स्पर्धेला खारघरमधील सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, खारघर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, भाजप नेते प्रभाकर जोशी, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रज्ञा प्रकोष्टच्या जिल्हा संयोजिका गीता चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, शैलेंद्र त्रिपाठी, अक्षय लोखंडे, चेतन नवघरे, शोभा मिश्रा, निर्मला यादव, मधुमिता जेना, शोभा मिश्रा, नीलम विसपुते, स्नेहल बोधाई, निर्मला यादव, सुशीला शर्मा, प्रवीण बेरा, निखिल काकडे, आदित्य हातगे, दुर्गा बन्सल, किरण रावडे, सर्जेराव मेंगाणे, संदेश वाडीकर, मयुर तायडे, अनिकेत पाटील, हार्दिक पटेल, शशांक त्रिपाठी, शुभ पाटील, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह पाहून खारघरसह संपूर्ण पनवेल आणि नवी मुंबई नमो खारघर मॅरेथॉनसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …