Breaking News

पनवेलमध्ये शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्त्रीशक्तीला सक्षम करण्याबरोबरच महिलांचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविले जातात. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शुक्रवारी (दि. 19) शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रमुख वक्त्या म्हणून ’मन की बात’च्या प्रदेश संयोजिका मृणाल पेंडसे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह महिला प्रदेश पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष उपस्थित होत्या.
व्यापक दृष्टी असलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्यामुळे देशातील लोकशाही आणखी सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून येत्या वर्षात देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे जे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी महिला बचत गट संस्थांना समृद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध योजना अमलात आणून त्यांचे सशक्तीकरण केले जात असतानाच देशातील महिलांना सर्वांत मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान मोदींकडून होत आहे. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत मृणाल पेंडसे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून महिलांना मार्गदर्शन केले.
पनवेलजवळील आकुर्ली येथील काकाजीनी वाडीत झालेल्या या कार्यशाळेला महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती, उपाध्यक्षा प्रज्ञा धवन, सचिव शिल्पा मराठे, यशोधरा गोडबोले, मृणाल खेडकर, अपर्णा पाटील, तृप्ती मामले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस सुजाता साळवी, दक्षिण जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुजाता दळवी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कोडगावकर, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, तालुकाध्यक्ष नीता चोणकर, यांच्यासह बांदा ते पनवेल विभागातील प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संध्या शारबिद्रे यांनी मानले.

शक्ती वंदन हा महिला शक्तीला वंदन आणि सबल करणारा कार्यक्रम आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली समाज विकसित झाला पाहिजे यासाठी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी करीत असताना महिलांप्रती आदरभावना वृद्धिंगत करण्याचे प्रामाणिक काम होत आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला आहेत आणि त्या आपल्या देशासाठी भूषणावह आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण देश आदिवासी समाज आणि महिलावर्गाकडे आदराने पाहत आहे. येणार्‍या काळात दोन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले असून बचत गट आणि संस्था अधिक शक्तिशाली बनणार आहेत. आजच्या या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन महिलांनी उत्तमपणे केले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply