Breaking News

सर्पमित्राकडून नागाला जीवदान

रेवदंडा ः प्रतिनिधी

रेवदंड्यातील हवालदार यांच्या निवासस्थानी भरवस्तीत नाग घुसल्याने एकच हाहाकार उडाला होता. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र दुशांत झावरे यांनी त्वरेने या ठिकाणी जाऊन नागाला पकडले. त्यानंतर या नागाला सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यातील जंगल भागात सोडून देण्यात आले.सध्या कडक उन्हाने हवामान तप्त झाले आहे. त्यामुळे थंडावा शोधण्यासाठी नागाने भरवस्तीतील हवालदार यांच्या निवासस्थानात आसरा शोधला. तेथे हवालदार कुटुंबीयांना नाग दिसताच त्यांची धावाधाव सुरू झाली. यानंतर सर्पमित्र दुशांत झावरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तेथे बोलावण्यात आले. सर्पमित्र दुशांत झावरे यांनी नागाला कोणत्याही प्रकारची इजा न करता सुरक्षितरीत्या पकडले. हा नाग अंदाजे चार फूट लांबीचा असून खाद्याच्या शोधात येथे आल्याची शक्यता आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply