Breaking News

गिरवले ते सोमटणे रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
गिरवले ते सोमटणे रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधीमधून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) भूमिपूजन झाले.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विविध विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार उरण विधानसभा मतदार संघातील गिरवले ते सोमटणे या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले.
या वेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, प्रवीण खंडागळे, तानाजी खंडागळे, सरपंच सुनील माळी, प्रवीण ठाकूर, सोमाटणे ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजस्वी पाटील, उपसरपंच दीपा पाटील, सदस्य अविनाश मुंढे, सुवर्णा कांबळे, रजनी मुंढे, आंबो मुंढे, विशाल पाटील, कृष्णा मोरे, पुंडलिक दिघे, अतुल पाटील, भीमसेन मुंडे, धनंजय पाटील, रवींद्र कांबळे, आत्माराम पाटील, महिंद्र कांबळे, संदीप पाटील, चेतन पोपेटा, मंगेश पोपेटा, समीर बैकर, राजेश पाटील, गणेश बैकर, प्रमोद कुरंगले, जनार्दन पाटील, आत्माराम हातमोडे, मारुती पाटील, आतिश पोपेटा, प्रशांत मुंडे, प्रमोद पाटील, परेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply