पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचा 74वा स्वातंत्र्यदिन शनिवारी (दि. 15) पनवेल परिसरात ठिकठिकाणी देशभक्तीपर वातावरणात आणि जल्लोषात साजरा झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण-कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज येथे ध्वजारोहण करण्यात आले. या शिवाय जिल्हा परिषद शाळा कोपर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय कोपर, जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र गव्हाण आणि गव्हाण ग्रामपंचायत येथेही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 74वा स्वातंत्र्यदिन सोशल डिस्टन्सिंगे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ घरत, वसंतशेठ पाटील, विजय घरत, अनंता ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, काशिनाथ पाटील, योगीता भगत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …