पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या नवी मुबंई विभागामध्ये ’उड्डाण’ महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले.
या महोत्सवाचे आयोजन चांगूकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये करण्यात आले होते. 25 विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा, लघुपट स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, पोवाडा स्पर्धा यांचे सादरीकरण केले. श्रेत्रिय समन्वयक प्रा. डॉ. बी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा पार पडली.
या महोत्सवात महाविद्यालयाचे 14 विद्यार्थ्यानी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकवल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी विद्यार्थी आणि डिएलएलई विभागाचे कौतुक केले. या लघुपट स्पर्धेत संकेत गायकवाड, जयश्री वारचंद, प्रणव शहा, मानसी तुमला व इतर विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. या महोत्सवात प्रा.महेश धायगुडे, प्रा.मिनल मांडवे, प्रा.अंकिता जांगिड, प्रा.राहुल कांबळे यांनी सहकार्य केले.
उड्डाण महोत्सवात महाविद्यालयाचे नावलैकिक केल्याबद्दल विद्यार्थी आणि डिएलएलई विभागाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.सिध्देश्वर गडद ेयांनी कौतुक केले.