पनवेल : वार्ताहर
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेत काम करणार्या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 288 कर्मचार्यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.
नगरविकास खात्याकडून या संदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल 25 जानेवारी 2019 रोजी दिला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचार्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर 288 कर्मचार्यांचा सोमवारी (दि. 23) महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे कर्मचारी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्यांना धन्यवाद देत आहेत.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …