Breaking News

उलवेत चित्रकला स्पर्धा व आरोग्य शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त
75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांना गुणगौरव केला. याचठिकाणी द मिलेनियम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि डायग्नोस्टीकच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धा जुनियर, सिनियर आणि दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत ठाकूर, युवा नेते सागर ठाकूर, उलवे नोड 2 युवा मोर्चा उपाध्यक्ष विनय घरत, निखील घरत, विराज ठाकूर, सर्वेश ठाकूर, दैवत पाटील, संकेत घरत, अभित ठाकूर, पंकज म्हात्रे, दिवेश म्हात्रे, आशिष ठाकूर उपस्थित होते. दरम्यान, आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिबिराला भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश वारे, शुक्रेश शेळके, सचिन बडे, प्रणित म्हसकर, शशी रंजन, नितीन पवार, कुष्माकर ओझा, उमेश लोखंडे, संजय मोरे, विकी बनसोडे आदी उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply