Breaking News

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी  
कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अलिबागमधील श्रीबाग नं. 2 येथे हे डायलेसिस सेंटर सुरू झाले आहे. उद्घाटन समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा विभाग कोकण प्रांत प्रमुख विवेक भागवत, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, भाजपचे रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतिश धारप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक रघुजी आंग्रे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशिल पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, दिलीप भोईर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, सेवा हा संघाच्या विचारांचा मूळ गाभा आहे. त्यामुळे आपली संख्यांत्मक कितीही वाढ झाली तरी विचारांचा आदर्श ठेवून सेवाकार्य सुरू ठेवले पाहिजे. कमळ नागरी सहकारी पंतसंस्था संघाच्या विचाराने काम करीत आहे. आर्थिक क्षेत्रात काम करीत असताना सेवाकार्यदेखील करीत आहे. श्री. सतिश धारप डायलेसिस सेंटरमध्ये केवळ तांत्रिकता असता कामा नये. येथे उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना सेवाभाव दिसला पाहिजे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून मनुष्यसेवा करण्याची संधी या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे या केंद्राचे व्यावसायिक केंद्र होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच उपचार देत असताना किडनीचे आजार होऊ नये यासाठी जनजागृती करावी, असे विवेक भागवत म्हणाले.
कमळ पतसंस्थेचा विकास होत आहे. त्यात आम्हाला सोबती व्हायला मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. ही संस्था सहकाराबरोबरच  सामाजिक कार्यदेखील करत आहे. या सेवा घेणार्‍यांचे आशीर्वाद त्यांना मिळणार आहेत. या संस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घेतला पाहिजे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. रामशेठ ठाकूर परिवारातर्फे श्री. ससिश धारप डायलेसिस सेंटरला 11 लाख रुपये देणगी दिली जाईल, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
आपल्याकडे कितीही मोठ्या यंत्रणा असल्या, साधने असली तरी त्याचा उपयोग नाही. त्याचा वापर मानवसेवेसाठी करण्याची इच्छाशक्ती असावी लागते, तरच चांगली कामे करता येतात. हे डायलेसिस सेंटर अलिबागमध्ये सुरू झाले आहे तसे हृदयविकारावर उपचार करणारे केंद्र रागयड जिल्ह्यात सुरू व्हायला पाहिजे, अशी इच्छा सतीश धारप यांनी व्यक्त केली.
कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी प्रास्ताविक केले. पतसंस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांनी  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले, तर कमळ सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रधान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply