Breaking News

भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

पनवेल : वार्ताहर
भाजपचे पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चिखले येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत 600 विद्यार्थ्यांना
अन्नदान केले. युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतो. यंदाही त्यांचे वाढदिवसानिमित्त युवा चषकाचे आयोजन, व्होकल फॉर लोकल माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांचा सन्मान हे कार्यक्रम राबविण्यात आले.तर वाढदिवसी चिखले येथे असलेल्या आदिवासी निवासी शाळेत अन्नदानाचा उपक्रम राबविला. या शाळेत 600 विद्यार्थ्यांकडून या अन्नदानाचा लाभ घेतला. केदार भगत यांच्या सामाजिक उपक्रमांचा सर्वत्र कौतुक केले जात आहे. या वेळी केदार भगत यांच्यासमवेत गीतांजली भगत, निकिता पाटील, श्वेता पवार, सचिन भगत, सुमित दसवंते, फिरोझ शेख, नितेश भगत,जयेश दसवंते, योगेश साळवी, रवी पारचे, भावेश शिंदे, संतोष वर्तले, चिन्मय भगत, चेतन म्हसकर, यज्ञेश पाटील, ब्रिजेश बहिरा तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply