उरण : वार्ताहर
विंधणे हरिश्चंद्र पिंपळे बोरखार या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, उरण आणि पनवेल तालुक्यात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार उरण विधानसभा मतदार संघातील विंधणे ते बोरखार या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी 1,76,00698 इतक्या रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. तर अडीच कि.मी.च्या या रस्त्याचे काम पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झाले.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उद्योगपती पी.पी. खारपाटील, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, भाजपच्या उरण महिला अध्यक्षा राणीताई म्हात्रे, रोशन डाकी, प्रसाद पाटील, अजित पाटील, मनोहर फुंडेकर, अतुल पाटील, शशिकांत म्हात्रे, समीर मढवी, मनोहर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …