Breaking News

पनवेलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी लसीकरण; जंतनाशक आरोग्य तपासणीही कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका व मिनिस्ट्री ऑफ पेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी
(दि. 10) आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाळीव श्वान व मांजर अँटीरेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी तसेच मोफत लसीकरण कार्यक्रम नवीन पनवेल येथे जागृती प्रकल्प सभागृहामध्ये घेण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मिनिस्ट्री ऑफ पेट्सचे प्रवीण नावंधर, देवेश नावंधर उपस्थित होते. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी या वेळी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच रेबीजचा प्रसार कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने भटक्या कुत्र्यांसाठी येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्च अँटी रेबीज कॅम्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमामध्ये सुमारे 523 पाळीव कुत्रा व मांजराची नोंदणी करण्यात आली होती. या वेळी विविध एनजीओचे प्रतिनिधी, पाळीव कुत्रा व मांजराचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पडली आहे.
                                                                     -आमदार प्रशांत ठाकूर

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply