Breaking News

सिडको पुनर्विकास प्रकल्प गृहनिर्माण संस्थेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिला सिडको पुनर्विकास प्रकल्प भरत एनक्लेव्ह ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 10) झाला. या भूमिपूजन सोहळ्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवत चेअरमन माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
नवीन पनवेल सेक्टर 17 येथे होणारा हा गृहनिर्माण प्रोजेक्ट सुसज्ज सर्व सोईसुविधांनी सज्ज असून ह्या गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन संदीप भरत पाटील आहेत. हा प्रोजेक्ट टीपीव्ही लॅण्ड एलएलपीचा येत असून हा प्रोजेक्ट विश्वकर्मा ग्रुप, टीपीव्ही आणि केदार बिल्डर यांच्या माध्यमातून होत आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह पोपटलाल वेलजी, पियुष जोशी, रायगड कृषी उत्पादन बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चेअरमन माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरातला धनुर्विद्यासाठी आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरात हा गेली अनेक वर्ष धनुर्विद्या खेळामध्ये …

Leave a Reply