म्हसळा : प्रतिनिधी
विज बिलाच्या थकीत रकमेच्या वसूलीसाठी महावितरण कंपनीने म्हसळा उपविभागात येणार्या बीएसएनएलच्या दहा टॉवरचा विज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका झाला नॉट रिचेबल झाला आहे
महावितरणच्या म्हसळा उपविभागात बीएसएनएलचे लिपणीवावे, आंबेत, म्हसळा, सुरई, वांगणी, कोळे, मेंदडी, कोळे, संदेरी, पांगळोली येथे टॉवर आहेत. त्या टॉवरच्या 15 लाख 29 हजार 903 थकीत बिलाच्या वसूलीसाठी त्यांचा विज पुरवठा करण्यात आल्याचे महाविरणचे उपकार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांनी सांगितले.
विज बील थकबाकीदारांची संख्या व रक्कम फार मोठया प्रमाणात असल्याने अक्रमकतेने कारवाई करून वसुली करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे बीएसएनएल टॉवरचा विज पुरवठा कट करावा लागला.
-सतीश वानखेडे, उपकार्यकारी अभियंता,
महावितरण, म्हसळा