Breaking News

कामगारांवर अन्याय करणार्‍या अमेटी विद्यापीठावर कडक कारवाई करा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कामगार विभागाला आदेश

मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी विद्यापीठातील कामगारांवर होणार्‍या अन्यायाची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभिर्याने दखल घेत विद्यापीठावर कडक कारवाई करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठास कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत.
भाताण येथील अमेटी विद्यापीठातील कामगारांवर होणार्‍या अन्याविरोधात आमदार महेश बालदी यांनी मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.13) दुसरी बैठक आयोजित केली होती.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मंत्रीमहोदयांनी कामगार आयुक्तांना विद्यापीठाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या विभागाने केलेल्या चौकशीमध्ये अमेटी विद्यापीठ कामगारांवर अन्याय करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयांनी या विद्यापीठावर कडक कारवाईचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठास कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत.
या बैठकीस भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, भाताणचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकूर, अनिल काठावले, युवा कार्यकर्ते अनिल भोईर, स्वप्नील भोईर, किरण मुकादम, कामगार प्रतिनिधी तकदीर सते, रमेश भोईर, संदीप म्हस्कर, नितेश पाटील, प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply