Breaking News

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे बुधवारी भूमिपूजन

मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि.14) सायंकाळी 5 वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण असणार आहेत.
कळंबोली सेक्टर 11मधील प्लॉट क्रमांक 6/1 येथे होणार्‍या या समारंभास राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकाम, खारघर नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण, कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण, महापालिका मुख्यालयलगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व उन्नतीकरण, पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण तसेच अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मल प्रक्रिया केंद्र उभारणे आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्था उभारणे या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply