Breaking News

पनवेलमध्ये 152 नवे पॉझिटिव्ह

तिघांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी  (दि.16) कोरोनाचे 152 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 21 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 38 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी सेक्टर 1 तुलसी हार्मोनी, कळंबोली सेक्टर 2 केएल 5 आणि कामोठे सेक्टर 20 विश्वा हायलंड सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी  आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 27 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3474 झाली आहे. कामोठेमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 5027 झाली आहे. खारघरमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 5021 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4041 झाली आहे. पनवेलमध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3711 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 850 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 22,124 रुग्ण झाले असून 20,211  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.62 टक्के आहे. 1,345 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 508  जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply