पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरात हा गेली अनेक वर्ष धनुर्विद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्याने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धनुष्यबाण घेण्यासाठी अर्थ सहाय्य मिळण्यासाठी विनंती केली होती. गुरुवारी (दि. 22) पद्मनाभ खरात ह्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते धनुष्यबाण घेण्यासाठी दीड लाखाच्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने घेतलेल्या धनुष्यबाण स्पर्धेमध्ये पदमनाभ गणेश खरात ह्याने रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला असून, ठाणे विभागामध्ये प्रथम आणि राज्यामध्ये आठवा क्रमांक मिळविला आहे. या पूर्वी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेने घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, पद्मनाभ खरात याने लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आर्थिक मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. या वेळी कामगार नेते सुरेश पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, आर.पी.यादव, गणेश खरात, श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे अनिल कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …