अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग येथील कुंटे बाग येथील जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागातील अभियंता कांबळे यांना लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यालयात कार्यरत असणारा अभियंता कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या कामाच्या फाईलचे काम रखडले होते. हे काम त्वरित व्हावे यासाठी लाचखोर कांबळे याने तक्रारदार यांच्याकडे काही रक्कमेची लाच मागितली असता या महिलेने तडजोड करीत काही रक्कम देण्याचे कबूल करीत नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
फिर्यादी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत विभागाचे उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 22) बांधकाम विभागात कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …