Breaking News

दहशतवाद्यांना पोसू नका; पाक, चीनला अमेरिकेचा सल्ला

वॉशिंग्टन ः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदद देणे बंद करा, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला उद्देशून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातील (युनो) आपापल्या जबाबदार्‍या यथाशक्ती पार पाडा, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना म्हटले आहे. युनोकडून घोषित करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये आश्रय घेत असल्याचे वारंवार समोर आले आहे; तर दुसरीकडे चीन मित्रराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पाठीशी घालताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. दहशवाद्यांना आश्रय देऊ नका आणि मदत करू नका, असे अमेरिकेने आपल्या परराष्ट्र विभागामार्फत युनोतील सर्व देशांना सांगितले आहे. पाकच्या कुरापती आणि चीनचे आडमुठे धोरण या पार्श्वभूमीवरच अमेरिकेने हा संदेश दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply