पनवेल ः प्रतिनिधी
पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे चिंध्रण ग्रामपंचायतीतील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच कमलाबाई एकनाथ देशेकर यांच्या विरोधात भाजपचे ग्रामपंचायत सदस्य नरेश पोशा सोनवणे, तुषार दशरथ दुर्गे, गणपत महादेव कडू, इंदिरा एकनाथ पाटील आणि चंद्रा कृष्णा कडू यांनी शेकापसोबत संगनमत करून अविश्वास ठराव मांडला. चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या माध्यमातून विकासाला चालना मिळाली. असे असतानाही शेकापच्या भूलथापांना भुलून या पाच सदस्यांनी अविश्वास ठराव संमत केला. भाजपच्या सदस्यांनी केलेल्या या वर्तनामुळे पक्षाची हानी होत असल्याने त्यांना उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या शिफारसीनुसार पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …